Maharashtra Corona Update : दिवसभरात 10,425 नवे कोरोना रुग्ण, बाधितांची संख्या सात लाखांवर

सध्या राज्यात 1 लाख 65 हजार 921 सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात आज 10 हजार 425 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 329 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या आता 7 लाख 03 हजार 823 वर जाऊन पोहचली आहे.

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात एकूण कोरोना बाधितांची संख्या 7 लाख 03 हजार 823 वर जाऊन पोहचली आहे.

त्यापैकी 5 लाख 14 हजार 790 जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या राज्यात 1 लाख 65 हजार 921 सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

राज्यात आज 12 हजार 300 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असून राज्याचा रिकव्हरी रेट 73.14 टक्के झाला आहे. राज्यात आज 329 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यूदर 3.24 टक्के एवढा आहे.

करोनाच्या प्रादूर्भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य सरकार व सर्व महापालिका यंत्रणा कसोशीने प्रयत्न करत आहेत. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर यासारख्या महत्वाच्या शहरांत अजुनही अजुनही नवीन करोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.