Maharashtra Corona News : दिवसभरात उच्चांकी 12,822 नवे रुग्ण, एकूण रुग्णसंख्या 5 लाखांवर

राज्यात आज एक लाख 47 हजार 48 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. : 12,822 new patients during the day, totaling over 5 lakh patients

एमपीसी न्यूज – राज्यात आज, शनिवारी दिवसभरात उच्चांकी 12,822 नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातल्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता 5 लाख 3 हजार 084 एवढी झाली आहे.

राज्यातील एकूण रुग्ण संख्येपैकी आत्तापर्यंत 3 लाख 38 हजार 362 रुग्ण बरे झाले असून राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 67. 26 टक्के इतके आहे. राज्यात आज एक लाख 47 हजार 48 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

सर्वाधिक ॲक्टिव्ह रुग्ण 41 हजार 266 पुणे येथे आहेत. त्यानंतर 22943 ठाणे येथे आहेत. राज्यात आज 275 रुग्णांचा मृत्यू झाला असून राज्यातील मृत्यूदर 3.45 टक्के इतका झाला आहे

 

राज्यामध्ये मुंबईत सर्वाधिक 1,22,316 कोरोनाग्रस्त आहेत. यापैकी 95,354 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, तर 19,914 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मुंबईमध्ये आत्तापर्यंत 6,751 जणांचा मृत्यू झाला आहे.

मुंबई पाठोपाठ पुणे जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या सर्वाधिक आहे. पुण्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या 1,09,988 एवढी आहे. यापैकी 66.89 रुग्ण बरे झाले आहेत, तर 41,266 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

राज्यामध्ये सध्या पुण्यात सर्वाधिक ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. पुण्यात आत्तापर्यंत 2,633 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

पुण्यामध्ये आज राज्यातले सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत. आज एका दिवसात पुणे मनपा क्षेत्रात कोरोनाचे 1,457 रुग्ण आढळून आले, तर 39 जणांचा मृत्यू झाला. तर मुंबईमध्ये एका दिवसात कोरोनाचे 1,304 रुग्ण सापडले आणि 5 जणांचं निधन झालं.

राज्यामध्ये आत्तापर्यंत केलेल्या एकूण टेस्टपैकी 19 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 9 लाख 89 हजार 612 व्यक्ती स्वतंत्र विलगीकरण असून 35 हजार 626 व्यक्ती संस्थात्मक विलगीकरन मध्ये आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.