Maharashtra Corona Update : सलग दुसऱ्या दिवशी 23,501 रुग्ण कोरोनामुक्त; 21,907 नव्या रुग्णांची नोंद

राज्यात 18 लाख 01 हजार 180 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या 39 हजार 831 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

एमपीसी न्यूज – राज्यात सलग दुसऱ्या दिवशी वीस हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आज, शनिवारी दिवसभरात 23 हजार 501 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर, 21 हजार 907 नव्याने बाधित रुग्णांची वाढ झाली आहे.

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ही 11 लाख 88 हजारांवर गेली आहे. त्यापैकी 8 लाख 57 हजार 933 बरे झालेल्यांना दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.

राज्यात सध्या 2 लाख 97 हजार 480 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मुंबईत सध्या 30 हजार 639 तर पुण्यात 79 हजार 489 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

मागील 24 तासांमध्ये राज्यात 425 जणांचा मृत्यू झाला. बरे होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण हे 72.22 टक्के एवढं झालं आहे. तर मृत्यूचं प्रमाण हे 2.71 टक्के एवढं आहे.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 57 लाख 86 हजार 147 नमुन्यांपैकी 11 लाख 88 हजार 15 नमुने पॉझिटिव्ह (20.53 टक्के) आले आहेत.

राज्यात 18 लाख 01 हजार 180 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या 39 हजार 831 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.