Maharashtra Corona Update : राज्यात आज 2,628 नवे रुग्ण; 3,513 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – राज्यात आज 2 हजार 628 नव्या कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली असून, 3 हजार 513 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात सध्या 33 हजार 936 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील आजच्या वाढीमुळे एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 20 लाख 38 हजार 630 एवढी झाली आहे. त्यापैकी 19 लाख 52 हजार 187 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्याचा कोरोना रिकव्हरी रेट 95.76 टक्के एवढा झाला आहे.

_MPC_DIR_MPU_II

राज्यात आज 40 रुग्ण दगावले असून आतापर्यंत राज्यात 51 हजार 255 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.51 टक्के एवढा आहे. सध्या राज्यात 1 लाख 77 हजार 560 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 2 हजार 025 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.