Maharashtra Corona Update : 5134 नव्या रुग्णांची नोंद तर 3296 रुग्ण कोरोनामुक्त

5134 new patients were registered while 3296 patients were corona free

​एमपीसी न्यूज ​- राज्यात आज 5 हजार 134 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 2 लाख 17 हजार 121 इतकी झाली आहे. आज 3 हजार 296 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 1 लाख 18 हजार 558 रुग्णांना बरे होऊन रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले आहेत. दरम्यान राज्यात एकूण 89 हजार 294 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहे. तर राज्यभरात आज 224 कोरोना बाधितांच्या मृत्यूची नोंद झाली असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 11 लाख 61 हजार 311 नमुन्यांपैकी 2 लाख 17 हजार 121 (18.69 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 6 लाख 31 हजार 985 लोक होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 45 हजार 463 लोक संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत.

दिलासादायक बाब म्हणजे आज एकूण 3 हजार 296 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 54.6 टक्के एवढं आहे. राज्यभरात आतापर्यंत 1 लाख 18 हजार 558 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. राज्यात आज 224 करोनाबाधित रुग्णाांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 4.26 टक्के एवढा आहे.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील

मुंबई: बाधित रुग्ण – 86,509 बरे झालेले रुग्ण – 58,137 मृत्यू- 5002, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-11, ॲक्टिव्ह रुग्ण- 23,359

ठाणे: बाधित रुग्ण- 50,829 बरे झालेले रुग्ण- 19,459, मृत्यू- 1381, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-1, ॲक्टिव्ह रुग्ण- 29,988

पालघर: बाधित रुग्ण- 8051, बरे झालेले रुग्ण- 3348, मृत्यू- 150, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-0, ॲक्टिव्ह रुग्ण- 4553

रायगड: बाधित रुग्ण- 6381, बरे झालेले रुग्ण- 3068, मृत्यू- 119, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-2, ॲक्टिव्ह रुग्ण-3192

रत्नागिरी:  बाधित रुग्ण- 667, बरे झालेले रुग्ण- 408, मृत्यू- 28, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-0, ॲक्टिव्ह रुग्ण-231

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- 249, बरे झालेले रुग्ण- 187, मृत्यू- 5, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-0 , ॲक्टिव्ह रुग्ण- 57

पुणे: बाधित रुग्ण- 30,131 बरे झालेले रुग्ण- 14,313 मृत्यू- 926, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-0 , ॲक्टिव्ह रुग्ण- 14,892 

सातारा:  बाधित रुग्ण- 1401, बरे झालेले रुग्ण- 851, मृत्यू-53, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-1, ॲक्टिव्ह रुग्ण- 532

सांगली: बाधित रुग्ण- 479, बरे झालेले रुग्ण- 261, मृत्यू- 11, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-0, ॲक्टिव्ह रुग्ण- 107

कोल्हापूर: बाधित रुग्ण- 969, बरे झालेले रुग्ण- 735, मृत्यू- 13, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-0, ॲक्टिव्ह रुग्ण- 221

सोलापूर: बाधित रुग्ण- 3369, बरे झालेले रुग्ण- 1783, मृत्यू- 313, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-1, ॲक्टिव्ह रुग्ण- 1272

नाशिक: बाधित रुग्ण- 5816, बरे झालेले रुग्ण- 3261, मृत्यू- 255, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-0, ॲक्टिव्ह रुग्ण- 2300

अहमदनगर: बाधित रुग्ण- 604, बरे झालेले रुग्ण- 415, मृत्यू- 17, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-0, ॲक्टिव्ह रुग्ण- 171

जळगाव: बाधित रुग्ण-4712, बरे झालेले रुग्ण- 2680, मृत्यू- 302, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-0, ॲक्टिव्ह रुग्ण- 1730

नंदूरबार: बाधित रुग्ण- 208, बरे झालेले रुग्ण- 143, मृत्यू- 9, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-0, ॲक्टिव्ह रुग्ण- 56

धुळे: बाधित रुग्ण- 1283, बरे झालेले रुग्ण- 752, मृत्यू-69, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-2, ॲक्टिव्ह रुग्ण- 460

औरंगाबाद: बाधित रुग्ण- 7002, बरे झालेले रुग्ण- 3190, मृत्यू- 306, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-0, ॲक्टिव्ह रुग्ण- 3506

जालना: बाधित रुग्ण- 832, बरे झालेले रुग्ण- 424, मृत्यू- 31, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-0, ॲक्टिव्ह रुग्ण-377

बीड: बाधित रुग्ण- 154, बरे झालेले रुग्ण- 95, मृत्यू- 3, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-0,ॲक्टिव्ह रुग्ण- 56

लातूर: बाधित रुग्ण-493, बरे झालेले रुग्ण-252, मृत्यू- 27, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-0, ॲक्टिव्ह रुग्ण- 214

परभणी: बाधित रुग्ण- 136, बरे झालेले रुग्ण- 83, मृत्यू- 4, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-0, ॲक्टिव्ह रुग्ण- 49

हिंगोली: बाधित रुग्ण- 297, बरे झालेले रुग्ण- 260, मृत्यू-1, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-0, ॲक्टिव्ह रुग्ण- 36

नांदेड: बाधित रुग्ण- 427, बरे झालेले रुग्ण242, मृत्यू- 16, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-0, ॲक्टिव्ह रुग्ण- 169

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- 292, बरे झालेले रुग्ण- 195, मृत्यू- 14, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-0, ॲक्टिव्ह रुग्ण- 83

अमरावती: बाधित रुग्ण-718, बरे झालेले रुग्ण-519, मृत्यू- 31, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-0, ॲक्टिव्ह रुग्ण- 168

अकोला: बाधित रुग्ण- 1731, बरे झालेले रुग्ण- 1246, मृत्यू- 89, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-1, ॲक्टिव्ह रुग्ण- 395

वाशिम: बाधित रुग्ण- 126, बरे झालेले रुग्ण- 95, मृत्यू-3, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-0, ॲक्टिव्ह रुग्ण-28

बुलढाणा: बाधित रुग्ण- 343, बरे झालेले रुग्ण- 186, मृत्यू- 13, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-0, ॲक्टिव्ह रुग्ण- 144

यवतमाळ: बाधित रुग्ण – 356, बरे झालेले रुग्ण -241, मृत्यू – 13, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू –  0, ॲक्टिव्ह रुग्ण – 102

नागपूर: बाधित रुग्ण – 1792, बरे झालेले रुग्ण- 1324, मृत्यू- 16, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू – 0, ॲक्टिव्ह रुग्ण- 452

वर्धा: बाधित रुग्ण – 26, बरे झालेले रुग्ण – 13, मृत्यू- 1, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू – 0, ॲक्टिव्ह रुग्ण – 12

भंडारा: बाधित रुग्ण – 95, बरे झालेले रुग्ण – 80, मृत्यू – 0, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू – 0, ॲक्टिव्ह रुग्ण – 15

गोंदिया: बाधित रुग्ण – 184, बरे झालेले रुग्ण – 112, मृत्यू – 2, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू – 0, ॲक्टिव्ह रुग्ण – 70

चंद्रपूर:  बाधित रुग्ण – 122, बरे झालेले रुग्ण – 72, मृत्यू – 0, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू – 0, ॲक्टिव्ह रुग्ण – 50

गडचिरोली: बाधित रुग्ण – 92, बरे झालेले रुग्ण – 64, मृत्यू – 1, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू – 0, ॲक्टिव्ह रुग्ण – 27

इतर राज्ये: बाधित रुग्ण – 145, बरे झालेले रुग्ण – 0, मृत्यू – 26, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू – 0, ॲक्टिव्ह रुग्ण – 119

एकूण: बाधित रुग्ण-2,17,121 बरे झालेले रुग्ण-1,18,558, मृत्यू- 9250, इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- 19, ॲक्टिव्ह रुग्ण- 89,294

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.