Maharashtra Corona Update : राज्यात आज 5,229 नवे रुग्ण तर, 127 मृत्यू

एमपीसी न्यूज – राज्यात आज 5 हजार 229 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली असून, 127 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आज देखील बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. आज 6 हजार 776 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

राज्य आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 18 लाख 42 हजार 587 एवढी झाली आहे. त्यापैकी 17 लाख 10 हजार 050 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत तर, सध्या 83 हजार 859 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

_MPC_DIR_MPU_II

राज्यात आज 127 रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत राज्यात 47 हजार 599 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.58 टक्के एवढा आहे तर, राज्याचा कोरोना रिकव्हरी रेट 92.81 टक्के एवढा आहे. राज्यात आतापर्यंत 1 कोटी 11 लाख 32 हजार 231 नमूने तपासण्यात आले आहेत. राज्यात सध्या 5 लाख 47 हजार 504 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 5 हजार 567 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

पुण्यात सर्वाधिक 19 हजार 553 सक्रिय रुग्ण आहेत तर, मुंबईत 13 हजार 754, ठाण्यात 14 हजार 990, नागपूर 4 हजार 498, अहमदनगर 3 हजार 82 सक्रिय रुग्ण आहेत.

राज्यातील संक्रमणाचा वेग मंदावला असल्याचे चित्र असून मागील काही दिवसांपासून नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. मात्र, राज्यातील मृत्यूदर कमी करण्याचे आव्हान आरोग्य विभागासमोर आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

You might also like