Maharashtra Corona Update : राज्यात आज 5,246 रुग्णांची नोंद; कोरोनामुक्तांचे प्रमाण 91.07टक्के

एमपीसीन्यूज : राज्यातील कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 91.07 टक्क्यांवर पोहोचले आहे. दरम्यान, आज राज्यात नव्याने 5,246 कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 117  रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली.

या माहितीनुसार, राज्यात आज 11,277 रुग्ण बरे झाले, त्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले. तसेच आत्तापर्यंत एकूण 15,51,282 करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी पोहोचले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 91.07  टक्क्यांवर पोहोचले असून, ही राज्यासाठी दिलासादायक बाब आहे.

दरम्यान, आज राज्यात 5,246 नवीन रुग्णांचे निदान झाले. तर 117 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यू झाला आहे. त्यामुळे सध्या राज्यातील मृत्यूदर 2.63 टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 92,50,254  प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 17,03,444म्हणजेच 18.42 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

सध्या राज्यात 12,52,758 व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत तर 12,003 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. आज राज्यात 5,246 नवीन रुग्णांची नोंद झाल्याने एकूण करोनाबाधितांची संख्या 17,03,444  झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III