Maharashtra Corona Update : संचारबंदीतही रुग्णवाढीचा आलेख चढताच ; दिवसभरात 67,123 नवे रुग्ण

एमपीसी न्यूज – राज्यात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, संचारबंदीतही रुग्णवाढीचा आलेख चढताच असून, आज दिवसभरात तब्बल 67 हजार 123 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. ही आजवरची सर्वाधिक एकदिवसीय रुग्णवाढ आहे.

आरोग्य विभागाच्या हवाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 37 लाख 70 हजार 707 वर जाऊन पोहोचली आहे. त्यापैकी 30 लाख 61 हजार 174 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. आज 56 हजार 783 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 81.18 टक्के एवढं झाले आहे.

_MPC_DIR_MPU_II

चिंताजनक बाब म्हणजे राज्यात सध्या 6 लाख 47 हजार 933 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशातील सर्वाधिक सक्रिय रुग्ण महाराष्ट्रात आहेत. आज 419 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला, आजवर एकूण 59 हजार 970 जण कोरोनामुक्त मुत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 1.59 टक्के एवढा आहे.

सध्या राज्यात 35 लाख 72 हजार 584 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 25 हजार 623 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आतापर्यंत 2 कोटी 35 लाख 80 हजार 913 नमूने तपासण्यात आले आहेत.

कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक असलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनच्या किंमतीत कपात करण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यानुसार यापुढे इंजेक्शनची कमीत कमी किंमत 899 तर जास्तीत जास्त तीन हजार 490 रुपये अधिकृत किंमत असेल.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.