Maharashtra Corona Update : राज्यात 62 लाख रुग्ण कोरोनामुक्त, रिकव्हरी रेट 96.87 टक्के

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात आज (मंगळवारी) 5 हजार 454 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांपैकी 62 लाख रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट वाढून 96.87 टक्के एवढा झाला आहे.

आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात आज 4 हजार 408 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 64 लाख 01 हजार 213 एवढी झाली आहे. महाराष्ट्रात सध्या 61 हजार 306 ॲक्टिव्ह कोरोना आहेत.

राज्यात आज 116 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आजवर 1 लाख 35 हजार 255 रुग्ण मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.11 टक्के एवढा झाला आहे.

राज्यात आतापर्यंत 5 कोटी 12 लाख 91 हजार 383 नमूने तपासण्यात आले आहेत. सध्या राज्यात 3 लाख 53 हजार 807 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 2 हजार 233 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.