Maharashtra Corona vaccination Update : राज्यात आजपर्यंत 74 हजार आरोग्य कर्मचाऱ्यांचे कोरोना लसीकरण

बीड जिल्ह्यात सर्वाधिक 151 टक्के लसीकरण

एमपीसी न्यूज – देशात दोन कोरोना लसीच्या ( Corona vaccination) वापराला परवानगी देण्यात आली आहे. 16 जानेवारीपासून देशात लसीकरणाला सुरूवात झाली. राज्यात आतापर्यंत 74 हजार आरोग्य कर्मचाऱ्यांचे (Health Worker) कोरोना लसीकरण पूर्ण झाले आहे.

_MPC_DIR_MPU_II

राज्यात शनिवारी आणि त्यानंतर मंगळवार, बुधवारी आणि गुरूवारी झालेल्या सत्रांमध्ये आतापर्यंत एकूण 74 हजार जणांना लसीकरण करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास ( Dr. Pradeep Vyas) यांनी दिली आहे.

राज्यात सर्वात जास्त बीड जिल्ह्यात (Beed District) 151 टक्के लसीकरण झाले आहे. पाठोपाठ हिंगोली, अमरावती, वर्धा, जालना आणि उस्मानाबाद जिल्ह्यात 100 टक्क्यांपेक्षा अधिक लसीकरण झाले. शुक्रवार (दि.22) सायंकाळी सात वाजेपर्यंतची ही आकडेवारी आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.