Maharashtra Corona Update : राज्यात कोरोनाचा जोर पुन्हा वाढतोय; आज 3,611 नवे रूग्ण

एमपीसी न्यूज – राज्यात कोरोना संसर्ग पुन्हा जोर धरत असल्याचे चित्र आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी साडे तीन हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली. आज दिवसभरात 3 हजार 611 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून, 38 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आरोग्य विभागाच्या हवाल्याने ‘एएनआय’ने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात आज झालेल्या रुग्ण वाढीमुळे राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 20 लाख 60 हजार 186 एवढी झाली आहे. त्यापैकी 19 लाख 74 हजार 248 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज 1 हजार 773 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

राज्यात सध्या 33 हजार 269 सक्रिय कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज दिवसभरात 38 रुग्ण कोरोनामुळे दगावले असून आतापर्यंत राज्यात 51 हजार 489 रुग्णांचा मृत्यू झाला. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.49 टक्के एवढा आहे तर रिकव्हरी रेट 95.91 टक्के एवढा झाला आहे.

राज्यात पुणे, ठाणे, मुंबई, नाशिक, अहमदनगर व नागपूर जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या अधिक आहे. मागील तीन चार दिवसांपासून राज्यात नव्यानं वाढ होणा-या रुग्णांची संख्या वा

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.