Maharashtra Corona Update : आज 9,068 रुग्णांना डिस्चार्ज; 8,744 नवे रुग्ण 

एमपीसी न्यूज – राज्यात आज नव्या रुग्णापेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. राज्यात आज 9 हजार 068 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला तर 8 हजार 744 नव्या कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली.

आरोग्य विभागाच्या हावाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 22 लाख 28 हजार 471 एवढी झाली आहे. त्यापैकी 20 लाख 77 हजार 112 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

राज्यात सध्या 97 हजार 637 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

राज्यात आज दिवसभरात 22 रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आजवर 52 हजार 500 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.36 टक्के एवढा आहे. तर, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 93.21 टक्के झाले आहे.

राज्यात 4 लाख 41 हजार 702 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 4 हजार 098 संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.