Maharashtra Corona Update : नवा उच्चांक ! राज्यात आज 63,729 नवे रुग्ण; 398 मृत्यू

30 लाख रुग्ण झाले कोरोनामुक्त

एमपीसी न्यूज – राज्यात लॉकडाऊनच्या दुसऱ्या दिवशी उच्चांकी कोरोना आकडेवारी समोर आली आहे. आज राज्यात 63 हजार 729 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांपैकी 30 लाख 04 हजार 391 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.

आरोग्य विभागाच्या हावाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 37 लाख 03 हजार 584 वर जाऊन पोहोचली आहे. त्यापैकी सध्या 6 लाख 38 हजार 034 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आज 45 हजार 335 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 81.12 टक्के एवढं झाले आहे.

राज्यात आज 398 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला, आजवर एकूण 59 हजार 551 जण कोरोनामुक्त मुत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 1.61 टक्के एवढा आहे.

सध्या राज्यात 35 लाख 14 हजार 181 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 25 हजार 168 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आतापर्यंत 2 कोटी 33 लाख 08 हजार 878 नमूने तपासण्यात आले आहेत.

पुण्यात सध्या सर्वाधिक 1 लाख 16 हजार 665 सक्रिय रुग्ण आहेत. त्यानंतर मुंबईत 84 हजार 378, ठाण्यात 84 हजार 038, नागपूर मध्ये 71 हजार 539 तर, नाशिक जिल्ह्यात 49 हजार 925 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.