Maharashtra Corona Update : राज्यात आज 2,620 नवे कोरोना रुग्ण, 2,943 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात आज (शुक्रवारी) 2 हजार 620 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून, 2 हजार 943 बरे झालेल्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आज घडीला 33 हजार 011 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आरोग्य विभागाच्य़ा आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोनाबाधित रूग्णांची संख्या 65 लाख 73 हजार 092 एवढी झाली आहे. त्यापैकी 63 लाख 97 हजार 018 रूग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट वाढून 97.32 टक्के एवढा झाला आहे.

राज्यात आज 59 कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला असून, आजवर 1 लाख 39 हजार 470 जण कोरोनामुळे दगावले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.12 टक्के एवढा आहे.

महाराष्ट्रात आजवर 5 कोटी 99 लाख 14 हजार 669 चाचण्या पार पडल्या आहेत. सध्या राज्यात 1 हजार 050 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत तर, 2 लाख 41 हजार 972 जण होम क्वारंटाईन आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.