Maharashtra Corona Update : 68 लाख रुग्ण कोरोनामुक्त, आज 41,327 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात आज (रविवारी) कोरोनाच्या 41,327 नव्या रुग्णांची भर झाली असून, 40,386 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांपैकी 68 लाख रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट 94.30 टक्के एवढा आहे.

आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 72 लाख 11 हजार 810 एवढी झाली आहे. सध्याच्या घडीला राज्यात सध्या राज्यात 2 लाख 65 हजार 346 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

 

राज्यात आज 29 जणांचा मृत्यू झाला आहे. आजवर 1 लाख 41 हजार 808 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.05 टक्के एवढा आहे. राज्यात आजवर 7 कोटी 19 लाख 74 हजार 335 प्रयोगशाळा नमुने तपासण्यात आले आहेत. सध्या 21 लाख 98 हजार 414 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 2,921 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

आज 8 ओमायक्रॉन बाधित रुग्णांची नोंद

राज्यात आज 8 ओमायक्रॉन बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 3 पुणे महानगरपालिका हद्दीत, 5 पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील आहेत. राज्यातील एकूण ओमायक्रॉन बाधित रुग्णांची संख्या 1 हजार 738 एवढी झाली आहे. त्यापैकी 932 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.