Maharashtra Corona Update : चिंताजनक ! महाराष्ट्रातील रुग्ण संख्या दहा लाखांच्या पुढे, दिवसभरात 24,886 नवे रुग्ण

राज्यात सध्या 2 लाख 71 हजार 566 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

एमपीसी न्यूज – मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातील रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचे चित्र आहे. राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्येने 10 लाखांचा टप्पा पार केला आहे. आज दिवसभरात 24 हजार 886 नवे रुग्ण आढळले असून 393 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

राज्य आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या आता 10 लाख 15 हजार 681 एवढी झाली आहे. त्यापैकी 7 लाख 15 हजार 023 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

सध्या 2 लाख 71 हजार 566 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

राज्यात आज 393 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 28 हजार 724‌ रुग्ण कोरोनामुळे दगावले आहेत. राज्याचा मृत्यूदर 2.82 टक्के एवढा आहे. आज दिवसभरात 14 हजार 308 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्याचा रिकव्हरी रेट 70.39 टक्के एवढा आहे.

महाराष्ट्रात पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पुण्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 2 लाख 23 हजार 710 इतकी झाली आहे. त्यापैकी 1,46,182 रुग्ण कोरोनातून बरे झाले असून 4,693 जणांचा मृत्यू झाला आहे.

सध्या पुण्यात 72 हजार 835 ॲक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडा 1 हजार 65 हजार 306 वर पोहचला असून 8,067 जण दगावले आहेत. मुंबईत 1 लाख 29 हजार 244 जणांनी कोरोनावर मात केली असून सध्या 27 हजार 642 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 10 लाखांच्या पुढे गेली आहे. कोरोना बाधितांच्या संख्येत महाराष्ट्र जगात पाचव्या स्थानी पोहोचला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.