Maharashtra Corona Update : संसर्गाचा वेग पुन्हा वाढतोय, आज राज्यात 6,159 नवे कोरोना रुग्ण

एमपीसी न्यूज – राज्यात आज, बुधवारी कोरोना रुग्णांची झालेली वाढ चिंता वाढवणारी आहे. आज राज्यात 6 हजार 159 नवे कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 17 लाख 95 हजार 959 इतकी झाली आहे. राज्यात मागील 24 तासांमध्ये 65 मृत्यूंची नोंद झाली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात मागील चोवीस तासांमध्ये 4 हजार 844 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आत्तापर्यंत महाराष्ट्रात एकूण 16 लाख 63 हजार 723 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा 92.64 टक्के इतका झाला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1 कोटी 4 लाख 56 हजार 962 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 17 लाख 95 हजार 959 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

_MPC_DIR_MPU_II

राज्यात सध्या 5 लाख 29 हजार 344 व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर 6 हजार 980 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यात आज नोंदवण्यात आलेल्या 65 मृत्यूंपैकी 56 मृत्यू हे मागील 48 तासांमधले आहेत. तर 9 मृत्यू हे मागील आठवड्यातले आहेत.

महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट येऊ नये म्हणून सर्वतोपरी काळजी घेतली जात आहे. महाराष्ट्रातल्या सीमांवर तपासणी करण्यात येते आहे. दिल्ली, गुजरात, गोवा आणि राजस्थान या चार राज्यातून येणाऱ्यांचीही चाचणी होते आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून राज्यात संसर्गाचा मंदावलेला वेग पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

You might also like