Maharashtra Corona Update : राज्यात आज 4,358 रुग्ण कोरोनामुक्त

एमपीसीन्यूज : महाराष्ट्रात आज, गुरुवारी दिवसभरात 4 हजार 358 रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आत्तापर्यंत 17 लाख 74 हजार 255 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.14 टक्के इतके झाले आहे.
राज्यात आज 3 हजार 880 नवे रुग्ण आढळले आहेत. राज्यात आज 65 मृत्यूंची नोंद झाली आहे. आज घडीला मृत्यूदर 2.57 टक्के इतका झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.
राज्यात कोरोनामुक्त रुग्णांचा आकडा वेगाने वाढत आहे. दैनंदिन नवीन बाधितांच्या तुलनेच करोनातून बरे होणाऱ्या रुग्णांचा आकडा अधिक असून आजची आकडेवारीही दिलासा देणारी ठरली आहे.
गेल्या 24 तासांत राज्यात 65 बाधितांचा मृत्यू झाला असून राज्यातील कोरोना मृत्यूदर आता 2.57 टक्के इतका झाला आहे. त्याचवेळी आज दिवसभरात राज्यात 3 हजार 880 नवीन रुग्णांचे निदान झाले असून 4 हजार 358 रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत.
आतापर्यंत एकूण 17 लाख 74 हजार 255 रुग्णांनी कोरोना विरुद्धची लढाई जिंकली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) आता 94.14 टक्के एवढे झाले आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1 कोटी 19 लाख 33 हजार 956 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 18 लाख 85 हजार 773 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5 लाख 6 हजार 914 व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत, तर 4 हजार 33 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.