Pune : कॉम्प्युटर हार्डवेअर, मोबाईल रिपेअरिंग कोर्समधील यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव

एमपीसी न्यूज- महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या पी.ए. इनामदार आय.सी.टी. अॅकॅडमी संचालित कॉम्प्युटर हार्डवेअर , मोबाईल रिपेअरिंग कोर्सच्या यशस्वी शालेय विद्यार्थ्यांचा मंगळवारी झालेल्या कार्यक्रमात प्रमाणपत्रे देऊन गौरव करण्यात आला .

युसुफ मेहरअली सेंटरचे प्रकल्प संचालक मतीन दिवाण यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. आबेदा इनामदार, तनवीर इनामदार, डॉ. ऋषी आचार्य प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी डॉ.पी. ए. इनामदार होते.

या शैक्षणिक कॉम्प्युटर हार्डवेअर, मोबाईल रिपेअरिंग कोर्सच्या 3 हजार 349 विद्यार्थ्याना प्रशिक्षण देण्यात आले. अँग्लो ऊर्दू गर्ल्स हायस्कूल, इंग्लिश मिडीयम स्कूल, अँग्लो ऊर्दू बॉईज हायस्कूल, पैं परवाझ विशेष तुकडीतील विद्यार्थी, विद्यार्थिनी त्यात सहभागी झाले

_MPC_DIR_MPU_II

या कार्यक्रमात बालवाडी, के.जी., पहिली ते सातवीच्या शालेय विद्यार्थ्यांनी अॅपल फोन दुरुस्ती, टॅब, कॉम्प्युटर दुरुस्तीची प्रात्यक्षिके दाखवली. या प्रात्यक्षिकात जुवेरिया युसुफ खान, उमर शेख, आफरिन पठाण, आशरिया शब्बीर खान या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या प्रात्यक्षिकातील गुणवंत विद्यार्थ्यांना ‘डॉ पी. ए .इनामदार आय. टी. स्पेशल अवॉर्ड’ देऊन गौरविण्यात आले.

डॉ. पी. ए. इनामदार म्हणाले, ” शैक्षणिक, आर्थिक मागास समाजात उमेद जागवून त्यांना जिंकण्याचा, प्रगतीचा आत्मविश्वास देण्याचे काम आम्ही करीत आहोत. आताच्या शिक्षण पध्दतीत प्रमाणपत्र देण्यावर भर दिला जातो, मात्र, आमच्या कँपस मध्ये आत्मविश्वास, उमेद देण्यावर भर दिला जातो आहे. संगणक तंत्रज्ञान, इंग्रजी संभाषण देण्याचे काम आम्ही राज्यातील 80 शाळांमध्ये विनामूल्य करीत आहोत”

पी.ए. इनामदार आय.सी.टी. अॅकॅडमीच्या संचालक मुमताझ सय्यद यांनी प्रास्ताविक केले. अंजुम काजळेकर, आसिफा वाधवान यांनी सूत्रसंचालन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.