Maharashtra : सत्तेपेक्षा देश महत्वाचा..म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी केला नवाब मलिक यांच्या प्रवेशाला विरोध

एमपीसी न्यूज : : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी (Maharashtra) सत्ताधारी आणि विरोधी पक्षात नेहमी खडाजंगी पाहायला मिळते. पण यावेळी मात्र सत्ताधारी पक्षातच दोन गट तयार झाल्याचे दिसून येत आहे. त्याचे कारण बनले आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक.

नवाब मलिक यांनी आज अजित पवार यांना पाठींबा देऊन सत्ताधारी पक्षाच्या बाकावर बसण्याचा त्यांनी निर्णय घेतला. यावरून सभागृहात जोरदार वादाचे वातावरण पाहायला मिळाले. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नवाब मलिक यांच्या भूमिकेवरून टिकेलाही सामोरे जावे लागले.

परंतु, नवाब मलिक यांच्या भूमिकेला फडणवीस यांनी विरोध केला असून त्यांचा प्रवेश सत्ताधारी पक्षात होऊ नये यासाठीही अजित पवार यांना पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी म्हंटले आहे, की सत्ता येते आणि जाते. पण सत्तेपेक्षा देश महत्वाचा…

Pune : लवकरच वाजणार निवडणुकीचा बिगुल – दीपक मानकर

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस – Maharashtra

माजी मंत्री आणि विधानसभा सदस्य श्री. नवाब मलिक हे आज विधिमंडळ परिसरात येऊन कामकाजात सहभागी झाले होते. विधानसभा सदस्य म्हणून त्यांचा तो अधिकार सुद्धा आहे. त्यांच्याबाबत आमची वैयक्तिक शत्रूता अथवा आकस अजिबात नाही, हे मी प्रारंभीच स्पष्ट करतो.

परंतु, ज्या पद्धतीचे आरोप त्यांच्यावर आहेत, ते पाहता, त्यांना महायुतीमध्ये घेणे योग्य ठरणार नाही, असे आमचे मत आहे. सत्ता येते आणि जाते. पण सत्तेपेक्षा देश महत्वाचा आहे. सद्या ते केवळ वैद्यकीय आधारावर जामीन मिळाल्याने बाहेर आहेत. त्यांच्यावरील आरोप सिद्ध न झाल्यास आपण त्यांचे जरूर स्वागत करावे. मात्र अशा प्रकारचे आरोप असताना त्यांना महायुतीचा भाग करणे, हे योग्य होणार नाही, असे आमचे स्पष्ट मत आहे..” असे देवेंद्र फडणवीस म्हणालेत.

Total
0
Shares
Related Posts
Total
0
Share