Maharashtra : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन लीगमध्ये निगडीच्या ईश्वरी अवसरेचे तुफानी द्विशतक

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन तर्फे आयोजित सीनियर एक दिवसीय लीग स्पर्धेमध्ये विलास संघाने जालना जिल्हा महिला संघाला तब्बल 370 धावांनी हरवले.(Maharashtra) छत्रपती संभाजीनगरमध्ये टायगर क्रिकेट मैदान येथे हा सामना झाला. या सामन्यामध्ये विलास संघाच्या ईश्वरी अवसरे हिने 168 चेंडू मध्ये 270 धावा काढल्या. तिच्या या खेळीमध्ये तिने 51 चौकार आणि तीन षटकार मारले.  

नाणेफेक जिंकून विलास संघाने पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजी करताना 50 षटकांमध्ये विलास संघाने 406 अशी अशक्य वाटणारी धावसंख्या जालना जिल्हा क्रिकेट संघापुढे ठेवली. विलास संघाकडून फलंदाजी करायला आलेल्या भाविका अहिरे (2), स्नेहा भंडारे (17), प्रियंका संगवान (9) हे वरच्या फळी वरती येणारे फलंदाज कमी धावांवर बाद झाले. मग मधल्या फळीवर येणारी 14 वर्षीय ईश्वरी अवसरे हिने जालनाच्या गोलंदाजीला पुरेपूर धुतले असेच म्हणावे लागेल. इयत्ता आठवी मध्ये शिकणारे या मुलीने 168 चेंडू मध्ये नाबाद 270 धावा काढल्या आणि विलास संघाला 406 अशा विशाल धावसंख्येपर्यंत पोहोचवले.

Pune : पंडित आनंद भाटे यांचा साई पुरस्काराने गौरव

जालना जिल्हा संघ हे 407 धावांचे लक्ष बघूनच त्याने धीर सोडला असे आपण म्हणू शकतो. 19 व्या षतकात जालन्याचा संघ 36 धावांवरती पूर्णपणे बाद झाला. (Maharashtra) विलास संघाकडून तनुजा भोसले हिने 17 धावा देऊन 3 गडी बाद केले. तर तन्वी पाटील हिने दोन बळी घेतले. तेजश्री कदम, सृष्टी सूर्यवंशी, आणि प्रियंका संगवान या सर्वांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

या सामन्याची सामनावीर ठरलेली ईश्वरी अवसरे ही राहायला प्राधिकरण, निगडी मध्ये आहे. ती सध्या प्राधिकरण येथील सी एम एस इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये इयत्ता 8वी मध्ये शिकते. निगडी येथील दिवेकर क्रिकेट अकॅडमी मध्ये ईश्वरी ही सुनील दिवेकर सरांकडून प्रशिक्षण घेते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.