Maharashtra Cyber: महाराष्ट्र सायबरमध्ये इंटर्नशिपची संधी

Maharashtra Cyber: Internship opportunity in Maharashtra Cyber इंटर्नशीपचा कालावधी 6 महिन्यांचा असेल. विहित कालावधी संपेपर्यंत उमेदवाराला इंटर्नशीप सोडता येणार नाही.

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र सायबरमध्ये इंटर्नशिपची संधी आली आहे. महाराष्ट्र सायबरने पात्र उमेदवारांकडून इंटर्नशीपसाठी अर्ज मागवले आहेत. पात्र उमेदवारांनी Twitter@MahaCyber1 वरील जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे आपला बायोडाटा [email protected] या ईमेलवर अथवा स्पीड पोस्टव्दारे 12 ऑगस्ट 2020 पर्यंत पाठवावे, महाराष्ट्र सायबर विभाग, विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी अशी माहिती दिली आहे.

इंटर्नशीपसाठी नियम, अटी व शर्ती खालील प्रमाणे आहेत.

# उमेदवारास संगणकीय तांत्रिक ज्ञान असावे व त्याचे इंग्रजी व मराठी भाषेवर प्रभुत्व असावे. संभाषण व लेखन कौशल्य असावे.

# इंटर्नशीपचा कालावधी 6 महिन्यांचा असेल. विहित कालावधी संपेपर्यंत उमेदवाराला इंटर्नशीप सोडता येणार नाही. (अपवादात्मक परिस्थितीत सक्षम प्राधिकारी यांची परवानगी आवश्यक)

# महाराष्ट्र सायबरकडून उमेदवारास कोणताही भत्ता, प्रवास भत्ता देण्यात येणार नाही.

# महाराष्ट्र सायबरच्या कार्यालयात उमेदवारास कार्यालयीन दिवशी कार्यालयीन वेळेत उपस्थित रहावे लागेल.

# महाराष्ट्र शासनाच्या कार्यालयांसाठीचे गोपनियतेसंदर्भातील सर्व नियम व कायदे यांचे पालन उमेदवारास कसोशीने करावे लागेल.

# कार्यालयीन कोणतेही विषय/माहिती यांचा गैरवापर करणे, फेरफार करणे, ताब्यात घेणे असे गैरप्रकार उमेदवारास कोणत्याही परिस्थितीत करता येणार नाहीत.

अर्जासाठी पत्ता : The Special Inspector General of Police, Maharashtra Cyber, 32nd floor, World Trade Center, Cuffe Parade, Mumbai-400 005

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.