Maharashtra : दूध भेसळ करणाऱ्याला फाशीची तरतूद करावी – अजित पवार

एमपीसी न्यूज : राज्यात दूधाच्या उत्पादनात दिवसेंदिवस वाढ (Maharashtra) होत आहे. येत्या काही काळात राज्यात एक कोटी लीटरपर्यंत दूधाचे कलेक्शन जाण्याची शक्यता आहे. मात्र दूध व्यवसायात काही अपप्रवृत्तींचा शिरकाव झाला आहे. दूध भेसळ करणाऱ्यांचं मोठं सामाज्र पसरलं आहे. ही बाब गंभीर आहे. असे मत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत व्यक्त केले. 

पुढे ते म्हणाले, की दूध भेसळ करुन लहानग्यांच्या, सर्वसामान्य जनतेच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार सुरु आहे. आघाडी सरकारच्या काळात दूध भेसळ करताना सापडल्यास त्याला फाशीची शिक्षा करण्याची तरतूद करण्याचा कायदा प्रस्तावित होता. परंतु राष्ट्रपती महोदयांनी या कायद्याला परवानगी दिली नाही.

Chinchwad : कुख्यात गुंड बाळा वाघेरेला राहत्या घरातून अटक

मात्र, दूध (Maharashtra) भेसळ करणाऱ्याला फाशीची तरतूद करावी. याशिवाय दुधाच्या व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी अतिरिक्त दूध उत्पादनाच्या काळात सहकारी संस्थांना पावडर करुन ती एक्सपोर्ट करण्याची परवानगी द्यावी.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.