Maharashtra : संपावर जाणाऱ्या शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होणार

एमपीसी न्यूज : जुनी पेन्शन योजना लागू (Maharashtra) करावी, या प्रमुख मागणीसाठी राज्यातील जवळपास 18 लाख सरकारी कर्मचारी उद्यापासून (14 मार्च 2023) बेमुदत संपावर जाणार असल्याची घोषणा करण्यात आली. मात्र, शिंदे-फडणवीस सरकारने समिती नेमू संपावर जाऊ नका असे आवाहन करूनही कर्मचारी संपाबाबत ठाम असल्याने आता संपावर जाणाऱ्या शासकीय आणि निमशासकीय अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे. असे सामान्य प्रशासन विभागाचे (सामाजिक विकास समन्वय) सचिव सुमंत भांगे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.  

उद्यापासून राज्यभरातील 18 लाख सरकारी आणि निम सरकारी कर्मचारी संप पुकारणार आहेत. सरकारकडून कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्याने कर्मचारी संपावर ठाम आहेत. सरकारकडून समिती स्थापन करणार असे सांगण्यात येत असले तरी निर्णयाची शाश्वती सरकार देत नसल्याने कर्मचारी संपावर जाणार असल्याचे समजतेय.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.