Jayant Patil : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीची नोटीस

एमपीसी न्यूज : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीची नोटीस आली आहे. जयंत पाटील यांना सोमवारी चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.(Jayant Patil) जयंत पाटील यांना आयएल आणि एफएलएस प्रकरणी उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आयएल आणि एफएलएसच्या माध्यमातून अनेकांनी आर्थिक मोठा गैरव्यवहार केला गेला असल्याचा आरोप होता. जयंत पाटील यांना सोमवारी हजर राहण्याचं समन्स देण्यात आलं आहे.

Pune : भरत नाट्य मंदिराच्या 31व्या वासंतिक नाट्य महोत्सवाला सुरुवात

राष्ट्रवादीच्या नेत्यांना ईडीची नोटीस येणं हे काही नवीन राहिलेलं नाही. आयएलएफस आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात जयंत पाटील यांना ही नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती आहे. ILFS च्या माध्यमातून अनेक बड्या लोकांनी आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. (Jayant Patil) यापूर्वी या प्रकरणात मनसेप्रमुख राज ठाकरे यांचीही ईडीने चौकशी केली होती. त्यानंतर आता जयंत पाटील यांना ईडीने चौकशीसाठी पाचारण केले आहे. ILFS प्रकरणात सर्वप्रथम दिल्लीतील आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा नोंदवला होता. त्यानंतर या आर्थिक गैरव्यवहाराची व्याप्ती पाहता हे प्रकरण सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीकडे सोपवण्यात आले होते. येत्या सोमवारी जयंत पाटील यांची ई़डीकडून चौकशी होणार आहे. मात्र, आता या नोटीसवर जयंत पाटील काय भूमिका घेतात, हे पाहावे लागेल.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

<