Maharashtra : शिक्षण विभागातर्फे नविन बदलानुसार आरटीई प्रवेशाच्या मार्गदर्शक सूचना जाहीर

एमपीसी न्यूज : – शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) प्रवेशासाठी शिक्षण ( Maharashtra) विभागाने प्राधान्यक्रम निश्चित केला आहे. त्यानुसार येत्या शैक्षणिक वर्षात आरटीईअंतर्गत प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना त्यांच्या घरापासून एक किलोमीटरच्या परिसरात अनुदानित शाळा, शासकीय शाळा व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व शाळा या प्राधान्यक्रमानुसार आरटीई अंतर्गत प्रवेश दिला जाणार आहे. या शाळा उपलब्ध नसल्यासच स्वंयअर्थसहाय्यित शाळेत प्रवेश घेता येणार आहे.

वंचित, दुर्बल, सामाजिक आणि शैक्षणिकदृृष्ट्या मागास घटकांतील विद्यार्थ्यांना आरटीईअंतर्गत प्रवेश दिले जातात. शैक्षणिक वर्ष 2024-25 होणाऱ्या प्रवेश प्रक्रियेसाठीच्या मार्गदर्शक सूचना प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी परिपत्रकाद्वारे प्रसिद्ध केल्या. आरटीई प्रवेशासाठी विद्यार्थ्याचे वय सहा वर्षापेक्षा अधिक असणे आवश्यक आहे. त्यासाठी दिनांक 31 डिसेंबर निश्चित करण्यात आला आहे. या पूर्वी आरटीई अंतर्गत शाळेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा अर्ज करता येणार नाही. तसेच आरटीई प्रवेशासाठी चुकीची माहिती भरून अर्ज केल्यास संबंधित विद्यार्थ्याचा प्रवेश रद्द करण्यात येईल, असे परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले ( Maharashtra) आहे.

Pimpri :  आंद्राचे पाणी पुन्हा कमी झाले;  अधिकारी, पाटबंधारे विभागाच्या अधिका-यांची तातडीने बैठक

आरटीई प्रवेशासाठी महानगरपालिकेच्या शाळा, नगरपालिका शाळा, नगर परिषद शाळा, नगरपंचायत शाळा, कटक मंडळाच्या शाळा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, महानगरपालिकेच्या स्वयंअर्थसहाय्यित शाळा, खाजगी अनुदानित शाळा आणि स्वंयअर्थसहाय्यित याच शाळांमध्ये प्रवेश दिले जाणार आहेत. अल्पसंख्यांक शाळांमध्ये प्रवेश दिले जाणार नाहीत, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी गट शिक्षणाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पडताळणी समिती नेमण्याचे निर्देश देण्यात आले आहे. पडताळणी समितीने गेल्यावर्षी प्रवेशित विद्यार्थ्यांची आकडेवारी, सुधारित अधिसूचना विचारात घेऊन पडताळणीचे कामकाज वेळेत होण्याचे नियोजन करावे. तसेच जिल्हा, तालुका, नगरपालिका, महापालिका स्तरावर तक्रार निवारण केंद्र, मदत केंद्र स्थापन ( Maharashtra)  करण्याची सूचनाही देण्यात आली आहे.

 

Total
0
Shares
Related Posts
Total
0
Share