Maharashtra Educational Institutions : संस्था, शाळांनी शैक्षणिक शुल्कासाठी अडवणूक करू नये – दीपक केसरकर

एमपीसी न्यूज – कोरोना काळात सर्वांचीच परिस्थिती हलाखीची होती. त्यामुळे अनेक पालक शैक्षणिक शुल्क भरू शकले (Maharashtra Educational Institutions) नाहीत. हे शुल्क बुडवण्याचा त्यांचा उद्देश नसतो. तेव्हा शिक्षण संस्थांनी विद्यार्थ्यांची अडवणूक करू नये, विद्यार्थी, पालकांची अडवणूक करणाऱ्या शिक्षणसंस्थांच्या विरोधात वेगळा विचार करावा लागेल. वेळप्रसंगी कारवाई करण्याबाबत निर्णय घेऊ, असे केसरकर यांनी सूचित केले.

श्री भैरवनाथ शिक्षण संस्था संचालित आदित्य इंग्लिश मिडीयम स्कुलच्या 22 व्या वर्धापनदिन व ‘नवरस 2022’ या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमात दीपक केसरकर बोलत होते. भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष माजी आमदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते ‘नवरस 2022’ या वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन झाले. श्री भैरवनाथ शिक्षण संस्था संचलित श्री पद्मावती माता प्राथमिक व माध्यमिक विद्यालय आळंदी येथील 15 अनाथ विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारले व महाराष्ट्र राज्य अपंग संस्थेचे अध्यक्ष समाजप्रबोधनकार लक्ष्मणराव पाटील यांच्या संस्थेतील अपंग विदयार्थ्याना आर्थिक सहकार्य देण्यात आले.

बाणेर येथील बंटारा भवन येथे झालेल्या कार्यक्रमावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी, प्रशासकीय अधिकारी नीलप्रसाद चव्हाण, सारंग कोडोलकर, शिक्षणाधिकारी सुनंदा वाखारे, संध्या गायकवाड, श्री भैरवनाथ शिक्षण संस्थेचे संस्थापक शिवलाल उर्फ नाना धनकुडे, अध्यक्षा सुरेखा धनकुडे, सचिव विराज धनकुडे, खजिनदार राहुल धनकुडे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. अविनाश ताकवले, सुषमा भोसले, मुख्याध्यापिका रेखा काळे आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना केसरकर म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या पाठीवरील (Maharashtra Educational Institutions) दप्तराचे ओझे कमी करण्याबाबत सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. अनेक विद्यार्थ्यांना वह्या घेणे शक्य होत नाही. त्यामुळे पुढील वर्षापासून पुस्तकासोबत वह्या देखील शासनामार्फत मोफत देण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच, पुस्तकात प्रत्येक पानासोबत एक कोरे पान दिले जाईल. ज्यावर विद्यार्थ्याला सराव करता येऊ शकेल व अतिरिक्त वही नेण्याची गरज भासणार नाही, असे केसरकर यांनी सांगितले.

Andheri Bypoll Result : अंधेरी पोटनिवडणुकीचा आज लागणार निकाल!

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.