Maharashtra Extends Lockdown : राज्यात 31 जुलै पर्यंत लॅाकडाऊन वाढवला

Maharashtra Extends Lockdown: Lockdown extended till July 31 in the state महाराष्ट्रात  ‘मिशन बिगिन अगेन’चा पहिला टप्पा येत्या 30 जून रोजी संपत असून 1 जुलै पासून दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होणार आहे. 

एमपीसी न्यूज – राज्यात लॉक डाउन 31 जुलै पर्यंत वाढवण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने  घेतला आहे. महाराष्ट्रात  ‘मिशन बिगिन अगेन’चा पहिला टप्पा येत्या 30 जून रोजी संपत असून 1 जुलै पासून दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होणार आहे. 

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी संबंधित जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त योग्य ती पाऊलं उचलत स्थानिक परिसरात निर्बंध लागू करु शकतात तसेच, करोना संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने अनावश्यक गोष्टींना परवानगी नाकारण्याची व लोकांच्या हालचालींवर प्रतिबंध ठेवण्याची  परवानगीही त्यांना देण्यात आली असल्याचे राज्य सरकारने सांगितलं आहे.

राज्यात ‘मिशन बिगिन अगेन’ अंतर्गत अनेक निर्बंध शिथील केले असून अनेक गोष्टींना परवानगी दिली आहे. 30 जून रोजी लॉकडाउन संपत असून मिशन बिगिन दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होणार आहे. यामुळे 30 जूननंतर सध्या असणारे निर्बंध 31जुलै पर्यंत  कायम असणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.