Maharashtra : दहावी, बारावी परीक्षेच्या अर्जासाठी मुदतवाढ, 20 डिसेंबर पर्यंत भरता येणार ऑनलाईन अर्ज

एमपीसी न्यूज : – राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत खासगी (Maharashtra) विद्यार्थ्यांना फॉर्म क्र. 17 भरून दहावी आणि बारावी परीक्षा देता येते. खासगी विद्यार्थ्यांना फेब्रुवारी-मार्च 2024 परीक्षेला बसण्यासाठी अतिविलंब शुल्क भरत ऑनलाइन माध्यमातून अर्ज करण्यास 20 डिसेंबर ही मुदतवाढ दिली आहे.

Alandi : कार्तिकी एकादशीनिमित्त साकारण्यात आले माऊलींचे मनमोहक रूप

शिक्षण मंडळाने यापूर्वी अतिविलंब शुल्कासह नावनोंदणी अर्ज भरण्यासाठी 7 डिसेंबरपर्यंत मुदत दिली होती. इयत्ता दहावी आणि बारावीसाठी प्रतिविद्यार्थी प्रतिदिन 20 रुपये अतिविलंब शुल्क स्वीकारून नावनोंदणी अर्ज सादर करण्यास अखेरची मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार सोमवार 11 ते 20 डिसेंबर या कालावधीत ऑनलाइन माध्यमातून अर्ज भरावेत, असे राज्य मंडळाच्यावतीने सांगण्यात आले आहे.

असा करा अर्ज –

1)    विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला मूळ प्रत, नसल्यास द्वितीय प्रत व प्रतिज्ञापत्र, आधारकार्ड, स्वतःचा पासपोर्ट फोटो आदी कागदपत्रे स्कैन करून अपलोड करावीत.
2)    विद्यार्थ्यांचा मोबाइल क्रमांक व ई-मेल आयडी अनिवार्य आहे. संपूर्ण भरलेल्या अर्जाची प्रिंट, शुल्कपावती, हमीपत्राच्या दोन प्रती विद्याथ्यांनी काढून घ्याव्यात.

3)     विद्याथ्यांनी अर्ज, ऑनलाइन नावनोंदणी शुल्क जमा केल्याबावत पोचपावती, मूळ कागदपत्रे त्यांनी नावनोंदणी अर्जावर नमूद केलेल्या माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयात मुदतीत जमा (Maharashtra) करावी.

 

Total
0
Shares
Related Posts
Total
0
Share