Maharashtra : कंत्राटी भरतीत सरकारचा 30 हजार कोटींचा घोटाळा
विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा आरोप

एमपीसी न्यूज – कंत्राटी पद्धतीने (Maharashtra) नोकरभरती करुन खासगी कंपन्यांच्या माध्यमातून पाच वर्षांत 30 हजार कोटी रुपयांची लूट राज्यातील मनुवादी सरकार करणार असल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला.
कंत्राटी नोकरभरतीसंदर्भात सरकारने काढलेल्या जीआरची जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर राज्यातील एससी, एसटी, एबीसी उमेदवारांनी होळी करावी. कंत्राटी कर्मचारी भरण्याच्या नावाखाली खासगी कंपन्यांना मलिदा खाऊ घालण्याचे काम सरकारने केले आहे.
कंत्राटी नोकरभरतीच्या जीआरनुसार पाच लाख पदे खासगीकरणातून भरली जाणार आहेत. त्यातून पाचशे कोटी रुपये प्रतिमहिना याप्रमाणे वर्षाला सहा हजार कोटी आणि पाच वर्षात 30 हजार कोटी रुपये या नऊ खासगी कंपन्यांच्या घशात घालण्याचा सरकारचा मानस आहे.
PCMC : ‘प्रगती’ची माहिती सक्षमपणे लोकांपर्यंत पोहचावा, अतिरिक्त आयुक्तांचे निर्देश
या भरतीमध्ये शिपायापासून ते अभियंत्यापर्यंतच्या पदाचा समावेश आहे. त्यामुळे (Maharashtra) कंत्राटी कर्मचा-यांची निवड ही गुणवत्तेच्या आधारावर न होता खासगी कंपन्यांच्या मर्जीतील माणसांना नोकरी मिळेल. सत्ताधा-यांच्या मर्जीनुसार जागा भरल्या जातील, असेही वडेट्टीवार म्हणाले.