Maharashtra : सरकारला तीन इंजिन तरीही राज्याचे आरोग्य व्हेंटिलेटरवर; रुग्णालयातील घटनेमुळे राज ठाकरेंचा संताप

एमपीसी न्यूज : – नांदेड येथील जिल्हा रुग्णालयात अवघ्या दोन (Maharashtra) दिवसांमध्ये 31 जणांचा मृत्यू, छत्रपती संभाजीनगरमध्ये 24 तासांत दोन नवजात बालकांसह 10 जणांचा मृत्यू झाल्यामुळे विविध स्तरातून संतृप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. याबाबत राज ठाकरे यांनी देखील संताप व्यक्त करत, सरकार व आरोग्य विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह उपस्थित केला आहे.

राज ठाकरे यांनी याबाबत ट्विट करत सरकारचा समाचार घेतला (Maharashtra)आहे. ते म्हणाले, ‘नांदेडमधल्या सरकारी रुग्णलयात गेल्या 24 तासात 24 मृत्यू झाले. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे.

मध्यंतरी ठाण्यात देखील अशीच घटना घडली. राज्यातल्या सरकारी रुग्णालयांमध्ये औषधाचा तुटवडा आहे. मुंबईत तर टीबीच्या औषधाचा तुटवडा असल्यामुळे ‘औषध पुरवून वापरा’ असा सल्ला दिला जातोय असं कळतंय.आणि ह्या घटना फक्त नांदेड, ठाणे आणि मुंबईपुरत्या नाहीत तर सर्वत्र आहेत.

 

Rahatani : खंडणी न दिल्याने बेकरी चालकाला बेदम मारहाण

तीन तीन इंजिनं लागून पण राज्याचं आरोग्य जर व्हेंटिलेटरवर असल्यासारखी परिस्थिती असेल तर उपयोग काय? सरकारच्या तिन्ही पक्षांनी स्वतःचा पुरेसा विमा उतरवल्यामुळे त्यांना कसलीच काळजी नाहीये पण महाराष्ट्राचं काय ?

दुर्दैव असं की सरकारमधले तीन पक्ष ठणठणीत सोडून बाकी महाराष्ट्र आजारी आहे अशी परिस्थिती आहे.
सरकारने स्वतःच आयुर्मान वाढवण्यासाठीची धडपड कमी करून महाराष्ट्राचं आरोग्य कसं सुधारेल ह्याकडे अधिक लक्ष द्यावं.’

राज्याला हादरवून टाकणारी घटना नांदेड जिल्ह्यातील डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात घडली.

ही घटना ताजी असतानाच आता छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील अशीच घटना घडली असून येथील घाटी रुग्णालयात 24 तासांत दोन नवजात बालकांसह 10 जणांचा मृत्यू झाला आहे. याबाबत सर्व स्तरातून राज्याच्या आरोग्य विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

Total
0
Shares
Related Posts
Total
0
Share