Pimpri News : पाडव्यालाही आनंदाचा शिधा मिळाला नाही

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र शासनाने 1 हजार रुपयांमध्ये “आनंदाचा शिधा ” देण्याची घोषणा केली. मात्र  नियोजन नाही. सवंग  प्रसिध्दी मिळवली. (Pimpri News) गोरगरिबांना,कष्टकऱ्यांना  शिधा पाडव्यालाही  मिळालाच नाही. सरकारने 1 कोटी 63 लाख रेशन कार्ड धारकांची फसवणूक केली आणि त्यांचा  पाडवा दुःखात गेल्याचा आरोप  कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी केली.

आनंदाचा शिधा मिळाला नसल्याने शिधापत्रिका धारकांनी नाराजी व्यक्त केली. याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, कष्टकरी संघर्ष  महासंघातर्फे  निषेध करण्यात आला. (Pimpri News) राज्य उपाध्यक्ष राजेश माने, इरफान चौधरी, भास्कर राठोड, अनिता जाधव, माधुरी वाघमारे आदी उपस्थित होते.

PCMC : …तर घरोघरचा कचरा एक एप्रिलपासून उचलणार नाही

यावेळी नखाते म्हणाले, की राज्य शासनाने यापूर्वीसुद्धा भर दिवाळीमध्ये अशा प्रकारच्या आनंदाचा शिधा देण्याची  घोषणा केली. त्याही वेळी  किट वरती महोदयांचे  फोटो लावायचे म्हणून त्यास उशीर झाला आणि आताही गुढीपाडवा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त 1 किलो साखर, 1 किलो रवा, 1 किलो चणाडाळ, 1 लिटर पाम तेलचे किट 100 रुपयांमध्ये देण्याची सवंग घोषणा करण्यात आली मात्र,  प्रत्यक्षात  धान्याचे (Pimpri News) किट द्यायचं नाही असे धोरण आहे. शहरातील  साधारण 1 लाख 15 हजार रेशन कार्डधारक या मागणीसाठी वारंवार रेशन कार्ड दुकानदाराकडे जात आहेत. मात्र त्यांना निराशापोटी परत यावे लागते हे अत्यंत चुकीचे असून घोषणा केली तर ती  प्रत्यक्षामध्ये आणली पाहिजे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.