Gram Panchayat Election : महाराष्ट्र ग्रामपंचायत मतदान 2021: राज्यभरात मतदानाला सुरुवात

एमपीसी न्यूज : आज राज्यातील जवळपास 14 हजारांहून अधिक गावांमध्ये मतदान पार पडत आहे. राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार काल थांबला.  तर 18 जानेवारीला मतमोजणी पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी प्रशासन देखील सज्ज झाले आहे.

राज्यात 34 जिल्ह्यातील 14, 234 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक पार पडणार आहे. यातील काही गावांच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. एप्रिल ते जून 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या 1 हजार 566 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 31 मार्च 2020 रोजी मतदान होणार होते.

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक ग्रामपंचायत निवडणूक पुढे ढकलण्यात आल्या होत्या. कार्यकाळ संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली होती. पण कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्यानंतर ग्रामपंचायत निवडणूक घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यानुसार आज राज्यभरातील जवळपास 14 हजाराहून अधिक ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे. सकाळी 7 वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी लाखो कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांमध्ये महसूल प्रशासनासह शिक्षकांचा समावेश आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.