Bjp Parliamentary Board : भाजपच्या संसदीय समितीत महाराष्ट्राला स्थान नाहीच; नितीन गडकरी यांना वगळले;फडणवीसांना स्थान नाही

एमपीसी न्यूज – भारतीय जनता पक्षाच्या नव्या संसदीय समितीमधून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नाव वगळण्यात आले आहे. त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांना यामध्ये स्थान मिळेल असे बोलले जात असतानाच त्यांनाही समितीत घेण्यात आलेले नाही. भाजपची नव्या संसदीय समितीची घोषणा (Bjp Parliamentary Board) करण्यात आली. मात्र त्यात महाराष्ट्रातून कोणताही नेता आता या समितीमध्ये नाही.

 

 

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपनं संसदीय समितीची घोषणा केली आहे. या समितीमधून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना स्थान देण्यात आलेले नाही. हे दोन्ही वरिष्ठ नेते या आधीच्या समितीत होते. मात्र आता त्यांची नावे वगळण्यात आली आहेत.त्यांच्या जागी आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांचा समावेश करण्यात आला आहे. या नेत्यांसोबत सुधा यादव, के.लक्ष्मण, सत्यनारायण जटीया आणि इक्बाल सिंह लालपुरा या नेत्यांना समितीत स्थान देण्यांत आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे या समितीत कायम आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.