Maharashtra HSC Result 2021 : 12 वीचा निकाल कुठे आणि कसा पाहाल?

एमपीसी न्यूज : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. उद्या (मंगळवारी, दि.03) दुपारी चार वाजता ऑनलाईन पद्धतीने निकाल जाहीर केला जाणार आहे. 

बारावीच्या निकालापूर्वी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाकडून विद्यार्थ्यांचे परीक्षा क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत. विद्यार्थी https://mh-hsc.ac.in या वेबसाईटवर भेट देऊन त्यांचा बैठक क्रमांक मिळवू शकतात.

बारावीचा निकाल कुठे उपलब्ध होणार?

बारावीचा निकाल http://mh-hsc.ac.in आणि https://www.mahahsscboard.in/  या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना त्यांचा बारावीचा निकाल उपलब्ध होऊ शकतो.

बारावी निकालाचा बैठक क्रमांक कसा मिळवायचा?

स्टेप 1:  http://mh-hsc.ac.in या वेबसाईटवरील सर्च सीट नंबरवर जा.
स्टेप 2: यानंतर तुमचा जिल्हा आणि तालुका निवडा
स्टेप 3: त्यानंतर तुमचं संपूर्ण नाव आडनाव, तुमचं नाव, वडिलांचं नाव याप्रमाणं नमूद करा
स्टेप 4: यानंतर सबमिट करा तुम्हाला तुमचा सीट नंबर मिळेल.

बारावीचा निकाल कसा पाहाल ?

निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी वर दिलेल्या कोणत्याही वेबसाईटवर जा.

त्यानंतर तुम्हाला HSC BOARD RESULT नावाचा ऑप्शन दिसेल.

त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा सीट नंबर स्पेसशिवाय टाईप करावा लागेल.

त्यानंतर खालच्या रकान्यात तुमच्या आईच्या नावाची पहिली तीन अक्षर टाकावी लागतील. म्हणजेच समजा तुमचा नंबर M123456 असा असेल आणि तुमच्या आईचे नाव रेश्मा असेल, तर तुमच्या पहिल्या रकान्यात M123456 हा सीट नंबर येईल आणि दुसऱ्या रकान्यात आईच्या नावाची पहिली तीन अक्षरे म्हणजेच RES असे लिहावे लागेल.

यानंतर लगेचच तुम्हाला तुमचा निकाल स्क्रीनवर पाहाता येईल

निकाल पाहिल्यानंतर तुम्हाला तो डाऊनलोडही करता येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना निकालाची प्रिंटआऊटही काढता येणार आहे.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.