Maharashtra : मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संभाजीनगर, जालना, बीड जिल्ह्यातील इंटरनेट व एसटी सेवा बंद

जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात संचारबंदी लागू

एमपीसी न्यूज –  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून (Maharashtra) आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप काल मनोज जरांगे पाटील यांनी केला होता. त्यानंतर ते आक्रमक भूमिका घेत थेट सागर बंगल्याच्या दिशेने मुंबईला  निघाले होते. परंतू जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात संचारबंदी लागू केल्याने ते माघारी फिरले.

आज जालना-घनसावंगी तालुक्यातील तिर्थपुरी गावात अज्ञातांनी बस पेटवून दिल्याची घटना समोर आली आहे. तिर्थपुरी गावात  सकाळी साडेसहाच्या सुमारास अंबड येथून रामसगावकडे जाणाऱ्या अंबड आगाराच्या या बसला आडवून अज्ञातांनी पेटवून दिले आहे.

Pimpri : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सायकल हा उत्तम पर्याय – अमित गोरखे

मनोज जरांगे सध्या भांबेरी गावात असून, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक एकत्रित येत आहे. तसेच राज्यभरातही आंदोलक  आक्रमक होताना पाहायला मिळत  आहे. त्यासाठीच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर  , जालना  आणि बीड या तीन जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद (Internet Service Closed) ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर गृह विभागाने  हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर  , जालना  आणि बीड जिल्ह्यातील इंटरनेट सेवा 10 तास बंद राहणार आहे. याबाबत गृह विभागाच्या अप्पर मुख्य सचिव सुजाता सैनिक यांनी आदेश काढले (Maharashtra) आहेत.

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.