Maharashtra : लाटांच्या विरुद्ध दिशेला पोहून आयपीएस अधिकारी कृष्ण प्रकाश प्रसाद यांनी विश्वात रचला नवा विक्रम

एमपीसी न्यूज : पिंपरी चिंचवडचे माजी पोलिस आयुक्त, IPS अधिकारी कृष्ण प्रकाश प्रसाद (Maharashtra) यांनी नवा पराक्रम आपल्या नावावर कोरला आहे. त्यांनी गेट वे ऑफ इंडिया ते एलिफंटा गुहेपर्यंत पोहण्याचे अवघड काम पूर्ण केले असून हा पराक्रम करणारे जगातील ते पहिले व्यक्ती ठरले आहेत. 

Pune News : भारतीय विद्या भवनमध्ये ‘कीर्तन संवाद’ कार्यक्रमाचे आयोजन

मिळालेल्या माहितीनुसार, रविवार, 26 मार्च रोजी कृष्ण प्रकाश प्रसाद यांनी लाटांवर पोहताना 16.20 किलोमीटरचे अंतर कापले आहे. यासाठी त्यांना 5 तास 26 मिनिटे लागली. त्या दरम्यान मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथून सकाळी 7.45 वाजता समुद्राच्या लाटांच्या विरोधात त्यांनी पोहायला सुरुवात केली. वास्तविक बाकीचे जलतरणपटू एलिफंटा गुहा आणि गेटवे ऑफ इंडिया दरम्यान समुद्राच्या लाटांसह समान अंतर पोहतात, पण (Maharashtra) त्यांनी लाटांच्या विरुद्ध दिशेला पोहून पराक्रम केला असून जगात हा पराक्रम करणारे ते पहिले व्यक्ती ठरले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.