Pune : 9 ऑगस्टला फक्त ठिय्या आंदोलन ; मराठा क्रांती मोर्चाकडून बंदची हाक नाही

एमपीसी न्यूज – राज्यभरात मराठा आरक्षण प्रश्न चांगलाच पेटला आहे. परळीमध्ये सुरू झालेल्या ठिय्या आंदोलनाने आता राज्यभर आक्रमक रूप धारण केल आहे. अनेक ठिकाणी हिंसेचा आगडोंब उडाला असताना आता या आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणजे लोकप्रतिनिधी आणि मंत्र्यांच्या घर, कार्यालयासमोर मराठा आंदोलन ठिय्या देऊन घोषणाबाजी करत आहेत.

दरम्यान, 9 ऑगस्ट ला मराठा क्रांती मोर्चाला 2 वर्ष पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर आज ( 7 ऑगस्ट ) पुणे जिल्हा मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांची बैठक पार पडली . या बैठकीत येत्या 9 तारखेला होणाऱ्या मोर्चाची दिशा ठरवण्यात आली.

पुणे शहरातील सर्व मराठा समाज बांधव जिल्हाधिकारी कार्यलयावर 2 ते 3 तास ठिय्या आंदोलन करणार आहेत, तर तालुका पातळीवर सर्व आंदोलकांनी तहसील कार्यलयावर ठिय्या आंदोलन करणार आहेत.

याप्रसंगी समन्वयक समितीद्वारे आंदोलन शांततेत करण्याचे आवाहन केलं आहे. तर 9 ऑगस्ट ला राज्यात कोणताही बंद करण्याची घोषणा मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांनी केलेली नाही. मात्र , जनभावना लक्षात घेता या दिवशी अघोषित बंद होण्याची शक्यता असल्याच देखील यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.