BNR-HDR-TOP-Mobile

Chinchwad : चिंचवड मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार लक्ष्मण जगताप यांना महाराष्ट्र मजूर पक्षाचा पाठिंबा

एमपीसी न्यूज – चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांना महाराष्ट्र मजूर पक्षाने पाठिंबा जाहीर केला आहे. पक्षाचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब आडागळे यांनी आमदार जगताप यांना पाठिंब्याचे पत्र दिले आहे.

यावेळी भाऊसाहेब आडागळे, पुणे जिल्हा अध्यक्ष शिवाजी चव्हाण, पुणे जिल्हा समन्वयक किशोर लोखंडे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष लालचंद आडागळे, स्वप्नील शेंडगे, मयूर गायकवाड, सविता आव्हाड, सतीश मिसाळ, लालचंद पवार, गणेश चव्हाण, मिना कांबळे, जना राजगुरू आदी उपस्थित होते.

भाऊसाहेब आडागळे हे स्वतः भोसरी विधानसभा मतदारसंघात पक्षाकडून निवडून लढवित आहेत. मात्र त्यांनी चिंचवड मतदारसंघात महायुतीचे उमेदवार आमदार लक्ष्मण जगताप यांना पाठिंबा जाहीर केला आहे. आमदार जगताप यांनी मतदारसंघात तसेच शहरात केलेल्या विकासकामांची पावती म्हणून महाराष्ट्र मजूर पक्षाने त्यांना पाठिंबा दिल्याचे आडागळे यांनी सांगितले. त्याचप्रमाणे आमदार जगताप यांनी निगडी येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास जागा मिळवून दिली.

पुतळाही बांधून दिला. तसेच साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त १ ऑगस्ट रोजी शासकीय सुट्टी जाहीर करून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन देऊन समाजाला सहकार्य केले. तसेच परिमंडल फ झोन कार्यालय पुण्यातून पिंपरी-चिंचवडमध्ये स्थलांतर करून घेत नागरिकांची सोय केल्याबद्दल आमदार जगताप यांना हा पाठिंबा देत असल्याचे आडागळे यांनी सांगितले.

HB_POST_END_FTR-A2

.