Maharashtra : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबरपासून, कामकाज किती दिवस चालणार?

एमपीसी न्यूज – राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Maharashtra)नागपूर येथे 7 डिसेंबर 2023 पासून सुरू होणार आहे. विधानभवन मुंबई येथे विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. यावेळी अधिवेशनाच्या कामकाजाबाबत चर्चा करण्यात आली.

या बैठकीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर,विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, (Maharashtra)विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील विधानसभा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे संबंधित उपस्थित होते.

Pimpri : अल्टिमेट, रुद्रा मार्शल, नि:युद्ध कराटेच्या खेळाडुंची बाजी

हिवाळी अधिवेशन गुरुवार 7 डिसेंबर 2023 ते बुधवार 20 डिसेंबर 2023 या कालावधीत पार पडणार आहे. अधिवेशनाचे एकूण दिवस 14 (सुट्ट्यासह) प्रत्यक्ष कामकाज 10 दिवस, सुट्या(शनिवार व रविवार) 4 दिवस.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.