_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

Maharashtra Lockdown News : लॉकडाऊनमध्ये वाढ, राज्यात 1 जूनपर्यंत निर्बंध कायम

एमपीसीन्यूज : कोरोना रुग्णसंख्येतील वाढ कायम असल्याने सध्या लागू असलेल्या सध्या ‘ब्रेक दि चेन’ अंतर्गत राज्यात लागू असलेल्या लॉकडाऊनमध्ये वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार 1 जूनपर्यंत राज्यात लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. याबाबत राज्य सरकारकडून अधिकृत आदेश प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

कोरोनाचे संकट अद्यापही पूर्णपणे टळलेले नाही. त्यामुळे ठाकरे सरकारने लॉकडाउनचा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल बुधवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री निर्णय घेणार असल्याची माहिती दिली होती. त्यानुसार राज्य सरकारकडून 1 जूनपर्यंत लॉकडाउन वाढवत असल्याचा अधिकृत आदेश प्रसिद्ध करत मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यात आली आहेत.

_MPC_DIR_MPU_II

राज्यातील कोरोनाचा उद्रेक रोखण्यासाठी ब्रेक दि चेन अंतर्गत राज्यात 14 एप्रिलपासून 1 मेपर्यंत कठोर निर्बंध लागू करण्यात आले. त्यानंतर ही मुदत 15 मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. येत्या शनिवारी ही मुदत संपत असल्याने राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर चर्चा करण्यात आली.

दरम्यान, या निर्बंधामुळे राज्यात करोनाची साथ नियंत्रणात आली असून राज्याचा रुग्णवाढीचा दर कमी झाला आहे. मात्र, काही जिल्हयात बाधितांची संख्या अधिक आहे. त्यामुळे सध्याचे निर्बध आणखी १५ दिवस वाढविण्याची एकमुखी मागणी सर्व मंत्र्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत केली होती. त्यानुसार १ जूनपर्यंत लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

एखाद्या ठिकाणी निर्बंध वाढवायचे असल्यास स्थानिक प्रशासनाकडे त्याबाबतचे अधिकार देण्यात आले आहेत. यासाठी निर्बंध लागू करण्याच्या 48 तास आधी नोटीस द्यावी, असेही सांगण्यात आले आहे. तर राज्यांतर्गत प्रवासासाठी RTPCR चाचणी बंधनकारक असून 48 तास आधीचा चाचणी अहवाल सादर करणे गरजेचे असल्याचे लॉकडाऊनबाबतच्या नव्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.