Maharashtra Lockdown : राज्यात शनिवार, रविवारचा लॉकडाऊन जाहीर

एमपीसी न्यूज – वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्यात शनिवार, रविवारचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आज (रविवारी) झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. शुक्रवारी रात्री 8 ते सोमवारी सकाळी सातपर्यंत हे निर्बंध लागू राहणार आहेत.

आज मंत्रिमंडळाची बैठक झाली. महाराष्ट्रात कडक निर्बंध तयार करण्यात आले आहेत. उद्या संध्याकाळी 8 वाजेपासून ते लागू राहतील. राज्यात नाईट कर्फ्यू राहील. सगळे मॉल, रेस्टॉरंट, बार बंद राहतील. अत्यावश्यक सेवा चालू राहतील. सरकारी कार्यालय 50 टक्के क्षमतेनं, इंडस्ट्री पूर्णपणे चालू, कन्स्ट्रक्शन साईट चालू राहिल.

यावेळी लॉकडाऊनविषयी बोलताना पवार म्हणाले की, राज्यातील गार्डन, चौपाट्या, धार्मिक स्थळं बंद राहतील. तसेच सर्व प्रकारच्या धार्मिक, सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमही बंद राहणार आहेत. रेमडेसिव्हिरची नियमावली लागू होईल. गरज नसलेल्यांना देणार नाही. सरकारी हॉस्पिटल्सध्ये तुटवडा नाही.’ पुणे आणि पिंपरी चिंचवड विभागात सध्या चालू असलेली संचारबंदी तशीच चालू ठेवण्यात आली आहे.

‘पहिल्या लाटेपेक्षा आता कठीण परिस्थिती आहे. लवकर कठोर पावलं नाही उचलली तर हॉस्पिटल बेड्सची संख्या कमी पडू शकते. कोरोनाबाबत लोकांची भीती दूर झाल्याने अडचणी वाढल्या. मागच्या वेळीपेक्षा पॉझिटिव्ह येण्याची संख्या वाढली. एकमेकांकडून लागण होण्याचं प्रमाणही वाढलं. ऑक्सिजन बेड कमी पडू नये, यासाठी उपाययोजना करत आहोत, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. तसेच  लॉकडाऊन लावण्याची वेळ आली तर दोन दिवसांचा वेळ देऊ, असेही ते म्हणाले.

मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख म्हणाले, उद्योजकांना वेळेचं बंधन घालून देणार आहोत, त्याची सविस्तर नियमावली बनवण्यात आली आहे. धार्मिक स्थळांबाबत नियमावली बनवणार आहोत. तसंच सिनेमागृह, नाट्यगृह, बगीचा, खेळाचे मैदान पूर्णपणे बंद असतील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.