Maharashtra Lockdown : राज्यात उद्यापासून 15 दिवस पूर्ण लॉकडाऊनची शक्यता

एमपीसी न्यूज – राज्यात कडक निर्बंध लागू असताना देखील कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडायची असेल तर कडक लॉकडाऊन लागू करणे महत्वाचे आहे. त्यामुळेच राज्यात उद्यापासून (बुधवारी, दि.21) 15 दिवसांचा लॉकडाऊन लागण्याची दाट शक्यता आहे.

राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक सुरु आहे. कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा या बैठकीत घेतला जात आहे. या बैठकीतच लॉकडाऊनचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

बैठकीत 15 दिवस लॉकडाऊन लावण्याची मागणी सर्व मंत्र्यांनी केली असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. आता सर्व निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हातात आहे, असे टोपे म्हणाले.

सध्या राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र त्यातही लोक रस्त्यावर फिरताना दिसत आहे. तसेच सार्वजनिक वाहतूकही अत्यावश्यक सेवेसाठी सुरु आहे. त्यामुळे कडक निर्बंध असले तरी त्याचा हवा तेवढा परिणाम होताना दिसत नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.