Maharashtra : प्रदूषीत नद्यांमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर, मुळा सर्वाधिक प्रदूषित यादीत तर त्याखालोखाल पवना नदीचा क्रमांक

एमपीसी न्यूज – देशातील प्रदूषित नद्यांचा अहवाल 6 नोव्हेंबरला प्रकाशित करण्यात (Maharashtra ) आला. त्या देशातील 58 राज्ये आणि सात केंद्रशासित प्रदेशांतील 603 पैकी 311 नद्यांची काही क्षेत्र प्रदूषित आढळली. यात महाराष्ट्रातील 55 नद्यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील मिठी, मुळा, सावित्री आणि भिमा या सर्वाधिक प्रदूषित, तर त्याखालोखाल गोदावरी, पवना, कन्हान आणि मुठा-मुळा या नद्या प्रदूषित आढळल्या.

नद्यांच्या प्रदूषण नियंत्रणासाठी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे ‘राष्ट्रीय पाणी गुणवत्ता देखरेख कार्यक्रम’ राबवण्यात येतो. यात पाण्यातील रसायने, सूक्ष्मजीव यांचा विचार केला जातो. विशेषत: पाण्यातील प्राणवायूच्या प्रमाणावरून त्याचे प्रदूषण ठरवले जाते. यासाठी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ देशभरातील नद्यांमधील पाण्याचे नमुने घेऊन ते प्रयोगशाळेत तपासते.

यापूर्वी 2018 मध्ये देशातील प्रदूषित नद्यांचा अहवाल प्रकाशित करण्यात आला होता. त्यात 351 नद्यांचे काही पट्टे प्रदूषित जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर आता हा अहवाल प्रकाशित झाला आहे. यात देशातील  603 नद्यांपैकी 311 नद्यांची काही क्षेत्रे प्रदूषित आढळली आहेत.

2019 आणि 2021 यादरम्यान महाराष्ट्रातील 55 नद्यांचे 147 ठिकाणी घेतलेले नमुने प्राणवायू मानकांच्या तपासणीत प्रदूषित आढळले. महाराष्ट्रातील मिठी, मुळा, सावित्री आणि भिमा या सर्वाधिक प्रदूषित, तर त्याखालोखाल गोदावरी, पावना, कन्हान आणि मुठा-मुळा या नद्या प्रदूषित आढळल्या.

इतर राज्यांचा विचार करायचा झाला तर  मध्यप्रदेशातील 19 , बिहारमधील 18, केरळमधील 18 आणि कर्नाटकातील 17 नद्यांचा (Maharashtra ) समावेश प्रदूषित नद्यांमध्ये आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.