Maharashtra MLC Election Results : शिक्षक, पदवीधर निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात

एमपीसी न्यूज : नाशिक आणि अमरावती पदवीधर तसेच औरंगाबाद, नागपूर, कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे निकाल (Maharashtra MLC Election Results) आज जाहीर होणार आहे. सकाळी 8 वाजेपासून पोस्टल मतमोजणीला सुरुवात होणार आहे. साधारण दुपारपर्यंत निकाल स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर प्रथमच भाजप व महाविकास आघाडी या निवडणुकीत आमने-सामने आले आहेत. त्यामुळे शिक्षक व पदवीधर निवडणुकीच्या या परीक्षेत कोण बाजी मारणार?, याकडे अवघ्या राज्याचे लक्ष आहे.

Pune Crime : दहशत पसरवणारा कुख्यात गुंड कोल्हापूर कारागृहात स्थानबद्ध

नाशिक पदवीधर मतदारसंघात सत्यजित तांबे आणि शुभांगी पाटील, अमरावती पदवीधरमध्ये काँग्रेसचे धीरज लिंगाडे-भाजपचे रणजित पाटील, औरंगाबादेत राष्ट्रवादीचे विक्रम काळे आणि भाजपचे किरण पाटील यांच्यात लढत आहे. नागपूर शिक्षक मतदारसंघात भाजप पुरस्कृत नागोराव गाणार व सुधाकर आडबाले, तर कोकण शिक्षकांमध्ये बाळाराम पाटील आणि भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्यात चुरस आहे.

​​​​​​​नाशिकमध्ये सत्यजित तांबे व भाजप बंडखोर शुभांगी पाटील यांच्यात खरी चुरस आहे. शुभांगी यांना ऐनवेळी भाजपने उमेदवारी नाकारल्याने त्यांनी बंड केले.(Maharashtra MLC Election Results) सत्यजित तांबे यांनी अपक्ष अर्ज भरला असून भाजपने छुपा पाठिंबा दिला आहे, तर शुभांगी यांना ठाकरे गटासोबतच आघाडीनेही पाठिंबा जाहीर केल्याने सामना चुरशीचा होईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.