Maharashtra Monsoon Assembly : अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक; गद्दार सरकार कोसळण्याची घोषणाबाजी

एमपीसी न्यूज : आजपासून महाराष्ट्राचे पावसाळी (Maharashtra Monsoon Assembly) अधिवेशन सुरु होत आहे. हे अधिवेशन ११ वाजता सुरु होणार असून, पहिल्याच दिवशी विरोधकांनी घोषणाबाजी करायला सुरुवात केली आहे. तसेच, हातात बॅनर घेऊन अनेक घोषणा दिल्या जात आहे.

सध्या सत्तेत असलेल्या शिंदे-फडणवीस सरकारला तीन पक्षांचा सामना करावा लागणार आहे. ठाकरे गटाची शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस असे हे तीन गट असून, ते पहिल्याच दिवशी आक्रमक झाले आहे. त्यांची प्रमुख मागणी आहे, कि ओला दुष्काळ जाहीर करा. यासोबतच हे सरकार गद्दार आहे. हे लवकरच कोसळणार आहे. हे ईडीचे सरकार आहे. बेकायदा सरकार आहे. त्यांचा धिक्कार असो अशा घोषणा केल्या जात आहेत.

Maharashtra Monsoon Assembly : ठाकरे गट आणि शिंदे गट आमने-सामने; आज होणार खडाजंगी

काही महिन्यांपूर्वी सत्तारूढ सरकारमधील (Maharashtra Monsoon Assembly) नेते हे घोषणाबाजी करत होते, तर बाकावर बसलेले आज घोषणाबाजी करत आहेत. विरोधी पक्षनेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली हि घोषणाबाजी सुरु आहे. यामध्ये आदित्य ठाकरे देखील सहभागी झाल्याचे दिसून येत आहे. याबद्दल ते म्हणाले, कि ना महिलांना स्थान आहे, ना मुंबईकरांना स्थान नाही. तसेच अपक्षांना स्थान नाही. हे गद्दारीने तयार झालेले सरकार आहे, हे कोसळणारच असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला आहे.

Mohit Kamboj : मोहित कंबोज यांच्या ट्विटमध्ये दडले काय? राष्ट्रवादीची होणार का भांडाफोड?

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.