Maharashtra Monsoon Assembly Session Live : महाराष्ट्राचे पावसाळी अधिवेशन 2022 अपडेट

एमपीसी न्यूज : Maharashtra Monsoon Assembly Session Live day 2 : पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाच्या कामकाजाला सुरूवात झाली असून हे शिंदे-फडणवीस सरकारचं पहिलं अधिवेशन आहे.

10.08 am: नाना पटोलेंनी काय म्हटलं…

नाना पटोलेंनी म्हटलं आहे की, रश्मी शुक्ला गृहमंत्र्यांना भेटायला गेल्या होत्या. कायद्यापेक्षा कोणी मोठं नसतं. प्रकरण कोर्टात आहे. आता बोलणं उचित नाही. मोहित कंबोज पक्षाचे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे ते भेटायला गेले असतील, असं नाना पटोले म्हणाले.

10.14 am: पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे निलंबित, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची विधानसभेत घोषणा, बीड जिल्ह्यातील अवैध धंद्यांच्या संदर्भात लक्षवेधी

पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे निलंबित, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची विधानसभेत घोषणा, बीड जिल्ह्यातील अवैध धंद्यांच्या संदर्भात लक्षवेधी, फडणवीस म्हणाले, राज्यात ज्या ठिकाणी असं सुरु आहे त्या ठिकाणी कारवाई केली जाईल

10.35.am विधानभवनात विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक सुरू, अजित पवार, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात यांची उपस्थिती, दिवसभर विरोधी रणनिती ठरवण्याबाबत चर्चा

 

विधानभवनात विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक सुरू, अजित पवार, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात यांची उपस्थिती, दिवसभर विरोधी रणनिती ठरवण्याबाबत चर्चा

10.42 am: विधीमंडळाच्या पायर्‍यांवर विरोधकांची घोषणाबाजी सुरू, ’50 खोके एकदम ओक्के’ची पुन्हा एकदा घोषणाबाजी

राज्यसरकार विरोधात शेतकऱ्यांच्या मुद्दयावर विरोधक आक्रमक.महाविकास आघाडी कडून आंदोलन. ईडी सरकार विरोधात घोषणावाजी सुरू. ओला दुष्काळ जाहिर करण्याची विरोधकांची मागणी.

10.57 am:  मुंबई गोवा महामार्गावरुन विधानसभेत गोंधळ

मुंबई गोवा महामार्गावरुन विधानसभेत गोंधळ, मुंबई-गोवा हायवेवर अडीच वर्षात काही काम झालं नाही का? असा प्रश्न भाजपनं सेनेच्या आमदारांना विचारला, त्यावर भास्कर जाधव यांनी गेल्या 12 वर्षात हे चंद्रकांतदादा, नितीन गडकरींचं अपयश आहे का असा प्रति सवाल केला.

12.19 pm:आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची पहिल्याच दिवशी दमछाक

  सभागृहात आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांची पहिल्याच दिवशी दमछाक झाल्याचं पाहायला मिळालं.  आरोग्याच्या सबंधित विरोधकांच्या प्रश्नावर उत्तर देताना सावंतांची चांगलीच दमछाक झाली.  पालघर जिल्ह्यातील हत्तीरोगाच्या संबंधित प्रश्नावर नेमकी माहिती आरोग्यमंत्री सभागृहाला देऊ शकले नाहीत. त्यामुळे विरोधक आक्रमक झाले. अखेरीस प्रश्न मागे ठेवावा लागला. त्यानंतर बीड येथील स्त्री भृण हत्या प्रश्नी उत्तर देताना बीड जिल्हा यासाठी प्रसिद्ध आहे असं वक्तव्य आमदार भारती लव्हेकर यांनी केलं, त्यानंतही विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केला.

12.25 pm: विरोधकांकडून 289 अंतर्गत सर्व कामकाज बाजूला ठेऊन भंडारा जिल्ह्यातील बलात्कार प्रकरणावर चर्चेची मागणी, पुन्हा विधानपरिषद 10 मिनिटांसाठी तहकूब

 

1.11 pm: आज विधीमंडळाच्या कामकाजादरम्यान अजित पवार यांनी पालघर घटनेवरुन सरकारला खडेबोल सुनावले तसंच प्रश्नही विचारले. आरोग्य सुविधांच्या अभावी बालकांचा मृत्यू होणं ही बाब लाज आणणारीआहे.

गावाला जोडणारा मुख्य रस्ता नसल्याने मोखाडा तालुक्यातील मरकटवाडी येथील गरोदर मातेला आपल्या दोन मुलांना उपचाराविना गमवावे लागलं. आरोग्य सुविधा नाहीत, आरोग्य केंद्रावर पोहोचण्यासाठी चांगला रस्ता उपलब्ध नाही, त्यामुळे या महिलेवर ही दुर्दैवी वेळ ओढावली. या संदर्भातील बातमी एबीपी माझाने दाखवली होती. विधीमंडळाच्या कामकाजादरम्यान अजित पवार यांनी पालघरमधील घटनेचा उल्लेख करत सरकारला प्रश्न विचारले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.