Maharashtra Monsoon Assembly : ठाकरे गट आणि शिंदे गट आमने-सामने; आज होणार खडाजंगी

एमपीसी न्यूज : महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन (Maharashtra Monsoon Assembly) आजपासून सुरु होत आहे. हे अधिवेशन मुंबईत सुरू होत असून, आक्रमक विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील ‘असंवैधानिक’ सरकारला विरोध करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

25 ऑगस्ट रोजी संपणाऱ्या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने राज्य सरकार लोकशाही प्रक्रियेचे पालन करत नसल्याचा दावा करत शिंदे सरकारने आयोजित केलेल्या चहापानावर बहिष्कार टाकला.

विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार म्हणाले, “सरकार ज्या पद्धतीने सत्तेवर आले, त्यावरून शिंदे सरकार घटनात्मक नियमांनुसार स्थापन झाले नाही, असे आमचे एकमत आहे.” यासंदर्भातील याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल प्रलंबित आहे. सर्व लोकशाही मूल्ये आणि नियमांच्या विरोधात हे सरकार स्थापन करण्यात आले आहे, असे पवार म्हणाले.

संततधार पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत, आरे येथील मेट्रो कारशेड आणि ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे अनेक निर्णय उलटणे यासारखे मुद्दे अधिवेशनाच्या (Maharashtra Monsoon Assembly) कामकाजावर वर्चस्व गाजवतील, असे एका राजकीय निरीक्षकाने सांगितले.

Rupali Thombare : राष्ट्रवादीच्या नेत्या म्हणतात ‘या’ तिघांची खाती बदला, यांना गृहमंत्री करा….

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.