Maharashtra : वाहन चालकांना 1 जुलै पासून मिळणार स्मार्ट कार्ड

एमपीसी न्यूज – वाहन चालवण्याचा परवाना आणि वाहन नोंदणी (Maharashtra) प्रमाणपत्राचे नवीन स्मार्ट कार्ड मिळणार आहे. याबाबत परिवहन विभागाने कर्नाटकातील कंपनीशी करार केला असून या कंपनीकडून 1 जुलैपासून स्मार्ट कार्डचा पुरवठा होणार आहे.

नवीन कंपनीकडून स्मार्ट कार्डचा पुरवठा 1 जुलैपासून होणार आहे. त्यासाठी अद्याप एक महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे तोपर्यंत नागरिकांना स्मार्ट कार्डसाठी प्रतीक्षा करावी लागेल. याचबरोबर राज्यातील केवळ पुणे, मुंबई व नागपूर या तीनच आरटीओंना स्मार्ट कार्डवर वाहनमालकाचे नाव आणि पत्ता छापण्याची परवानगी असणार आहे.

PCMC : शहराचे शेवटच्या टोक असलेल्या दापोडीला मुबलक पाणीपुरवठ्यासाठी 70 कोटींचा खर्च

परिवहन विभागाचा स्मार्ट कार्ड निर्मिती बाबतचा हैदराबादमधील रोझमार्टा (Maharashtra)  कंपनी सोबतचा करार संपुष्टात आला आहे. त्यामुळे कर्नाटकातील मनिपाल टेक्नॉलॉजी कंपनीसोबत यासाठी करार करण्यात आला आहे. या कंपनीकडून दिवसाला 45 हजार स्मार्ट कार्डचा पुरवठा होऊन राज्यभरातील आरटीओतील तुटवडा कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.