Maharashtra Mucormycosis Update : महाराष्ट्रात म्युकरमायकोसीसचे 4,086 रुग्ण, 828 रुग्णांचा मृत्यू

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग ओसरत असतानाच म्युकरमायकोसीस रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. सध्याच्या घडीला राज्यात 4 हजार 086 रुग्णावर उपचार सुरु आहेत. धक्कादायक म्हणजे आत्तापर्यंत 828 म्युकरमायकोसीस रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रात आत्तापर्यंत म्युकरमायकोसीसचे एकूण 8 हजार 646 रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी 3 हजार 583 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. तर, 828 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या महाराष्ट्रात 4 हजार 086 रुग्णावर उपचार सुरू आहेत. पुण्यात आजवर सर्वाधिक एक हजार 269 रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 311 रुग्ण बरे झाले असून, 96 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुण्यात सध्या 858 सक्रिय म्युकरमायकोसीस रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

याशिवाय मुंबई मध्ये 455, नागपूर जिल्ह्यात 553, औरंगाबाद मध्ये 374 आणि नाशिक जिल्ह्यात 208 सक्रिय म्युकरमायकोसीस रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

म्युकरमायकोसीस रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक असलेल्या ॲम्फोटेरेसिन-बी या औषधाचा पुरवठा सध्या राज्यात भासत आहे. एका रुग्णाला दिवसाला सहा इंजेक्शनची आवश्यकता असते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर इंजेक्शन आवश्यक असताना राज्यात मात्र कमतरता भासत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.